RRB GROUP D VACANCY : रेल्वेत 70,183 ग्रुप डी च्या पदांसाठी नवीन भरती, 10 वी उत्तीर्ण, जाणून घ्या प्रक्रिया

WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now
RRB Group D Bharti 2024 


RRB Group D Bharti 2024


रेल्वे ग्रुप D च्या भरतीची आतुरतेने वाट पाहत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी रेल्वे मंत्रालयाकडून खुशखबर मिळाली आहे. रेल्वेने मोठ्या प्रमाणावर तांत्रिक तसेच अतांत्रिक पदांसाठी या वर्षात मेगा भरती प्रक्रिया राबविण्यासाठी वेळापत्रक आधीच जाहीर केले आहे. 10 वी पास विद्यार्थ्यांसाठी नौकरीची संधी चालून आली आहे. 

        रेल्वे ग्रुप D च्या 70,183 पदांसाठी जाहीरात येणार आहे. ही पदांची संख्या रेल्वे मंत्री यांनी राज्यसभेत दिलेल्या माहितीनुसार व रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी एका मिडिया ग्रुप ला दिलेल्या माहितीनुसार घेण्यात आली आहे. इच्छुकांनी आपला अर्ज विहीत तारखेस खाली दिलेल्या संकेतस्थळावर जाऊन दाखल करावेत.


रिक्त असलेल्या एकूण पदांची संख्या - 70,183

रिक्त असलेल्या पदांचा सविस्तर तपशील पुढीलप्रमाणे

असिस्टंट (वर्कशॉप), असिस्टंट ब्रिज, असिस्टंट C व W असिस्टंट डेपो (स्टोअर), असिस्टंट लोको शेड (डिझेल) असिस्टंट लोको शेड (इलेक्ट्रिकल) असिस्टंट ऑपरेशन्स (इलेक्ट्रिकल), मेडिकल असिस्टंट, असिस्टंट पॉइंट्समन , असिस्टंट सिग्नल व टेलिकॉम, असिस्टंट ट्रॅक मशीन, असिस्टंट ट्रेन लाइटिंग व एसी, असिस्टंट TRD , असिस्टंट वर्क्स , असिस्टंट वर्क्स (वर्कशॉप), हॉस्पिटल असिस्टंट , असिस्टंट स्टोर व डेपो, ट्रॅक मेंटेनर ग्रेड - IV



आवश्यक शैक्षणिक अर्हता - मान्यताप्राप्त बोर्डातून 10 वी पास किंवा आयटीआय धारक उमेदवार पात्र आहे. 

                     

वया संबंधित पात्रता - उमेदवाराचे वय 01 जुलै 2024 अखेर 18 वर्ष ते 33 वर्ष असावे. परंतु वय समाप्त झालेल्या उमेदवारांना 03 वर्ष वय वाढवून मिळणार आहे. म्हणून सर्वसाधारण उमेदवारांना 36 वर्षाची अट असेल. नियमाप्रमाणे OBC विद्यार्थ्यांना 03 वर्षाची तर SC, ST उमेदवारांना 05 अतिरिक्त सुट आहे. 


अर्जाचा शुल्क - सर्वसाधारण, EWS व ओबीसी - 500 रुपये तर SC, ST, माजी सैनिक व महिला प्रवर्गासाठी - 250 रुपये 



निवडीची प्रक्रिया - सर्वप्रथम ऑनलाइन संगणकावर 100 गुणांची परीक्षा होईल. त्यामध्ये, विज्ञान 25 गुण, गणित 25 गुण, बुद्धिमत्ता 25 गुण व सामान्य अध्ययन व चालु घडामोडी 20 गुण याप्रमाणे होईल. एका प्रश्नासाठी एक गुण व एकूण 90 मिनिटांचा कालावधी असेल, ज्यामध्ये 1:3 नकारात्मक गुण पद्धत असेल. 

           लेखी परीक्षा पास होणार्‍या उमेदवारांमधून 1:3 या प्रमाणात उमेदवारांना शारीरिक चाचणीसाठी बोलविण्यात येईल. शारीरिक चाचणी पुढीलप्रमाणे घेण्यात येईल. 

1) 1000 मीटर धावणे 4 मिनिट 15 सेकंद 

2) 35 किलो वजन उचलून 2 मिनिटात 100 मीटर धावणे 

         

हेही वाचा - महाराष्ट्र स्टेट बोर्डात विविध पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू झाली आहे ; इच्छुकांनी येथे अर्ज करा 



नौकरीचे स्थान :- संपूर्ण भारत


ऑनलाइन अर्ज दाखल सुरू होण्याची दिनांक - सप्टेंबर 2024

ऑनलाइन अर्ज दाखल करण्याची अंतिम दिनांक - ऑक्टोबर 2024


संपूर्ण अधिकृत जाहिरात :- CLICK HERE (लवकरच जाहीर होईल.) 

भरती संबंधित अधिकृत संकेतस्थळ :- CLICK HERE

ऑनलाइन अर्ज येथे दाखल करा :- CLICK HERE


Post a Comment

0 Comments